RBI कडून पाच बँकांवर बंदी या बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत
RBI ने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा देखील समाविष्ट आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत RBI ची मोठी कारवाई
बँकांवर व्यवसाय निर्बंध :
आर्थिक स्थितीचे कारण देत RBI ने 24 फेब्रुवारी 2023 पासून 5 सहकारी बँकांवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, केंद्रीय बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ते नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही.
RBI ने यापैकी 3 बँकांवर अंशतः ठेवी काढण्यावर निर्बंध लादले आहेत आणि इतर दोन बँकांवर पूर्ण निर्बंध लादले आहेत.
➡️ 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा ⬅️
RBI ने सांगितले की, बँकेच्या पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. आरबीआयच्या सूचनांचा मुद्दा आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला म्हणून घेऊ नये.
या बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग कामकाज चालू ठेवू शकतात. यापूर्वी देशातील कमकुवत सहकारी बँकांवर कारवाई करताना आरबीआयने त्यांच्या बँकांचे परवानेही रद्द केले आहेत.
या बँकांवर बंदी घालण्यात आली :
रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ( Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा.
➡️ नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये झाले खात्यात जमा; यादीत नाव पहा ⬅️
सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank) या बँकांचा समावेश आहे.
SBI बँकेमध्ये खाते असेल तर वर्षाला मिळणार 1,20,000 रुपये
बँकांवर बंदी घालण्याचे कारण :
RBI कडून वेळोवेळी बँकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन आणि इतर कारणांसाठी बँकांवर कारवाई केली जाते.
अलीकडे काही राष्ट्रीयीकृत बँकांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या कामकाजात अनेक प्रकारच्या उणिवा दिसून आल्या आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बँकेने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावला आहे RBI New Rules.