Gold Silver Rate Today : जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा गिअर टाकला. चांदी दोन दिवसांत एक हजारांनी वधारली तर सोन्याचा पण भाव वाढला. आता ग्राहकांना सराफा बाजारात या दराने खरेदी करावी लागणार
➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️
सोने आणि चांदीत दरवाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात आणि जून महिन्यात ग्राहकांना दोन्ही धातूंनी मोठा दिलासा दिला होता. या महिन्याच्या सुरुवातीला सोने नरमले होते. तर चांदी चमकली होती. आता दोन्ही धातूंनी दरवाढीचा गिअर टाकला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीला ब्रेक लावल्याने दरवाढीला लगाम लागला. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यासारखा जूनमध्ये कोणताही रेकॉर्ड दोन्ही धातूंना नावे करता आला नाही. या महिन्याच्या अखेरीस बजेट 2024 सादर होणार आहे.
➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️
त्यामुळे सोने आणि चांदी भरारी घेणार की, स्वस्त होणार याकडे ग्राहकांचे, गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आता अशा आहेत मौल्यवान धातू्च्या किंमती.
नरमाईनंतर सोने वधारले
गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्यात दरवाढ झाली होती. जून महिन्यात किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात नरमाई होती. 2 जुलै रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची हजाराची उडी
➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️
आठवडाभरात चांदीला मोठी चमक दाखविता आली नाही. भावात मोठा बदल दिसला नाही. पण या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने उसळी घेतली. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.
जळगावमध्ये काय भाव
चांदीच्या दरात किलोमागे मंगळवारी पुन्हा हजार रुपयांची वाढ झाली. या तुलनेत सोने दरात अवघ्या 50 रुपयांची वाढ झाली. गेल्या महिन्यात चांदीचे दर 92 हजारांपर्यंत गेले होते. ते महिन्याच्या शेवटी 89 हजारांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी त्यात पुन्हा हजार रुपयांची वाढ होऊन भाव 90 हजार रुपये किलो झाले.
➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️
सोन्याचे दर 1 जुलै रोजी 150 रुपयांनी वाढले होते. त्यात मंगळवारी 50 रुपयांची वाढ होऊन सोने 72300 रुपये तोळा झाले. आठवडाभरात दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे बाजारपेठेच्या अभ्यासकांनी सांगितले.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी उतरली 24 कॅरेट सोने 71,692 रुपये, 23 कॅरेट 71,405 रुपये, 22 कॅरेट सोने 65,670 रुपये झाले. 18 कॅरेट 53,769 रुपये, 14 कॅरेट सोने 41,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,015 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.
➡️ महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये असा करा अर्ज
तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
➡️➡️ सोने-चांदीचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करा ⬅️⬅️