कोणत्या फोनवर बंद होणार WhatsApp?
सॅमसंगच्या अनेक मॉडेल्ससह LG, सोनी आणि अनेक जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. या यादीत अनेक कंपन्यांचा समावेश असून कंपनीच्या बदलत्या तांत्रिक गरजेनुसार जुने फोन अपडेट करता येत नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह मेसेजिंग अनुभव देण्यासाठी हा बदल आवश्यक आहे.
कंपनी अॅप बंद होण्याआधी वापरकर्त्यांना सूचना देणार आहे जेणेकरुन ते वेळीच आपला फोन अपग्रेड करू शकतील. व्हॉट्सॲपच्या सपोर्ट पेजवर चॅट हिस्ट्री नव्या फोनवर ट्रांसफर करण्याची माहिती उपलब्ध आहे.
जुन्या फोन वापरणाऱ्यांसाठी हा थोडा त्रासदायक निर्णय असला तरी तो टेक्नॉलॉजीच्या झपाट्याने वाढ होणाऱ्या गरजेकडे लक्ष वेधतो. काहींना फोन अपग्रेड करणे जड वाटले तरी काहींना नवीन फोनमध्ये मिळणाऱ्या अधिक फीचर्सचा फायदा होईल. आधीच काही अॅप्स जुने ऑपरेटिंग सिस्टमवर बंद झाले आहेत आणि आता व्हॉट्सॲपचा निर्णय. त्यामुळे तुमचे अत्यावश्यक अॅप्स चालू ठेवण्यासाठी तुमच्या फोनचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट असणे आवश्यक आहे. सध्या व्हॉट्सअॅप चालू ठेवण्यासाठी Android 5.0 किंवा त्यापुढील आणि iOS 12 किंवा त्यापुढील व्हर्जन असणे आवश्यक आहे.
‘या’ स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप होणार बंद
सॅमसंग
गॅलक्सी एस प्लस(X+), गॅलक्सी कोअर, गॅलक्सी एक्सप्रेसस टु गॅलक्सी ग्रँड, गॅलक्सी नोट थ्री (3), गॅलक्सी एस थ्री (S3) मिनी, गॅलक्सी एस-फोर (S4) मिनी, गॅलक्सी एसफोर झुम
मोटोरोला
मोटो जी (G), मोटो एक्स (x)
अॅपल
आयफोन फाइव्ह (5), आयफोन सिक्स (6), आयफोन सिक्स एस (65), आयफोन एस इ (SE) वाई असेंड पी सिक्स(6), असेंड जी फाईव्ह टु फाईव्ह (525),
ह्युवाई
सी वन नाईन नाईन (199), ह्युवाई जी एक्स १एस, वाईवा सिक्स टु फाईव्ह (625)
लेनोवो
लेवोव्हो 46600, लेवोव्हो, लेवोव्हो 46600, लेवोव्हो A858T, लेवोव्हो P7O, लेवोव्हो S890
सोनी
एक्सपेरिया झेड वन (Z1), एक्सपेरिया इ थ्री ( E3)
एलजी
ऑप्टिमस फोर एक्स एच डी (4X HD), ऑप्टिमस जी (G), ऑप्टिमस जी प्रो ( G Pro), ऑप्टिमस एल७
या यादीत तुमचा फोन आहे का ते तपासा आणि वेळीच तुमचा फोन अपग्रेड करुन व्हॉट्सॲप सेवा सुरळीत चालू ठेवा. त्याच बरोबर 35 मोबाईलची वेगळी यादी कंपनीने अधिकृत संकेत स्थळावर दिली आहे Bignews.